narhar-kurandkar

Chhatrapati Shivaji Maharaj (Part IV – Words of Well-Known Historian Narhar Kurundkar)

‘महाराजांनी अनेक नविन गावांच्या स्थापनांकरीता अनुदान दिले आहेत. शेतक-यांना परवडणारी कर पद्धती त्यांनी सुरू केली. ते स्वराज्याच्या रक्षणाकरीता तसेच शेतीतील उत्पन्न साठविण्याकरीता गड-किल्ल्यांचा वापर करीत असत. त्याकरीता ते किल्ले बांधणी करीत असत. बियाणे, औजारे इत्यादी शेती विषयक वस्तू घेण्याकरीता शेतक-यांना कर्ज देत असत. त्यांनी राज्यांतर्गत कारभार नीटनेटका व सुलभ सुरळीत चालावा तसेच राज्यातील उत्तम संवादाकरीता राजभाषा म्हणून मराठी भाषेची निवड केली. त्यांनी पंचांगाची सुधारीत पुर्नरचना करण्यास प्रोत्साहन दिले व करवून ही घेतले. आपल्या छत्रपतींची पुण्याई म्हणून त्यांना असे स्वराज्याचे रक्षक मिळालेत ज्यांनी शिवाजी महाराज गेल्यानंतर देखील छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याचे रक्षण केले व संभाजी महाराज गेल्यानंतर देखील ते एकोणीस वर्षे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर एकूण सत्तावीस वर्षे शत्रुंशी झुंज दिली. असे मानले जाते की 1707 पर्यंत या स्वराज्याच्या अनेक लढायांमध्ये मिळून कमीत कमी 5 लाख मुघल तर 2 लाखाहून अधिक मराठा मरण पावले. तरी देखील 1707 नंतर कोणत्याही राजाचे नैतृत्व नसताना, पगार मिळेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती नसताना देखील फक्त मातृभूमीसाठी आणि आपल्या राजांच्या स्वराज्यासाठी एक लाख मराठा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूशी झूंज देत राहीलेत. या 27 वर्षांच्या बहुतेक लढायांमध्ये औरंगजेबाला यशामागे यश मिळत होते परंतु शेवटपर्यंत औरंगजेबाला मराठ्यांना हरवून स्वराज्य मिळविता आले नाही. या उलट आपली संपूर्ण संपत्ती, सत्ता आणि शेवटी त्याला स्वतःचे आयुष्य गमवावे लागले. अखेर इंग्रजांनी 1757 मध्ये पेशवाईचा पराभव केला परंतु येथील लोकांना ब्रिटीश देखील शिवाजी महाराजांची जनता व या राष्ट्राला शिवाजी महाराजांचे राष्ट्र म्हणूनचं संबोधायचे आणि ओळखायचे. ते शिवाजी महाराजांना या राष्ट्राचे जनक व शोधकर्ता मानू लागले होते.

महाराज फक्त शूरवीर योद्धाच नव्हते तर ते एक उत्तम सेनानी देखील होते. त्याचबरोबर ते एक उत्तम राजकर्ते, शासन कर्ते होते. महाराज राज्य कारभारात जातीने लक्ष देत असतं. स्वराज्याच्या भोवतालचा परिसर हा मुघल तसेच आदिलशाह यांच्या ताब्यात होता आणि तो परिसर आपल्या स्वराज्यात आणण्यासाठी महाराज त्यांच्या सुरूवातीच्या काळात नेहमी शत्रुवर आक्रमण करण्याच्या पवित्र्यातचं असायचे. परंतु आक्रमणासाठी लागणा-या खर्चाकरीता महाराजांनी जनतेवर कधीच जास्तीचा किंवा अनावश्यक कर लादला नाही. जेव्हा केव्हा त्यांना एखादे राज्य जिंकण्यासाठी पैशांची गरज लागायची व त्यांच्याकडे पुरेसा खर्च करण्याकरीता रक्कम उपलब्ध नसायची तेव्हा ते त्या राजावर आक्रमण करण्याचे टाळायचे. परंतु त्यांनी कधी आपल्या जनतेचे हाल होवू दिले नाहीत. त्यांना नेहमी असे वाटायचे की, आपल्या जनतेवर आर्थिक भार पडता कामा नये. शिवाजी महाराज हे इतिहासातील अपूर्व आणि अद्वितीय माणूस. त्यामुळे त्यांची ओळख शत्रूंना तर लवकर झाली नाहीच, पण मित्रांनाही झाली नाही. महाराजांना जास्तीत जास्त ओळखले असेल तर ते औरंगजेबाने. कारण त्याने आपल्या पहिल्या सुभेदारीच्या वेळीच आदिलशाहीला शिवाजी महाराजांबद्दल इशारा दिला होता. दुस-या सुभेदारीच्या वेळी तर महाराजांनी जुन्नर, भिवंडी मारून औरंगजेबाला चुणूक दाखविलीच होती.

अफझल खानावर मिळविलेला विजय हा महाराजांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा विजय होता. कारण या विजयामुळे महाराजांना अंदाजित 65 हत्ती, 4000 अरेबीक घोडे, 1200 उंट आणि 3 लाख रूपयांचे दागीने तसेच 2000 उच्च जातीच्या कपडयांचा (सुमारे रूपये 7 लाख इतक्या किंमतीचा) माल मिळाला. या व्यतिरीक्त त्यांना या विजयातून अनेक तोफा, बंदूकी, आणि इतर हत्यारे मिळालीत. तसेच दहा हजारापेक्षा अधिक लोक स्वराज्यात शामील झालेत आणि हे सर्व स्वराज्याच्या हिताचे होते.’

– सुप्रसिद्ध इतिहासकार नरहर कुरुंदकर

‘Maharaj has given grants for the establishment of many new villages. He introduced a tax system that was affordable to farmers. They used forts to protect their sovereignty and to store agricultural income. They used to build forts for that. They used to give loans to farmers to buy agricultural items like seeds, implements etc. They chose Marathi as the official language for smooth and easy running of the internal affairs of the state and for better communication in the state. They encouraged and carried out the reformation of the Panchanga (पंचांग). As a tribute to our Chhatrapati, our Chhatrapati got such kind of guards who fought for Swarajya, even after Shivaji Maharaj passed away, under the guidance of Chhatrapati Sambhajiraje Shivajiraje Bhosle, and even after Sambhaji Maharaj passed away, they fought with the enemies for nineteen years. It means guards of swarajya fought with the enemies to protect swarajya for twenty-seven years after Chhatrapati Shivaji Maharaj passed away. It is believed that by 1707 at least 5 lakh Mughals and more than 2 lakh Marathas died in the various battles of this Swarajya. Yet after 1707, with no king to lead, no guarantee of pay or not, a lakh of Marathas would fight the enemy till their last breath, just for the motherland and the self-rule of their kings. During most of these 27 years of battles, Aurangzeb had success after success but in the end Aurangzeb could not defeat the Marathas and gain independence. Instead he had to lose all his wealth, power and finally his life. Finally, the British defeated the Peshwa in 1757 but the people here were also called and recognized by the British as the people of Shivaji Maharaj and this nation as the nation of Shivaji Maharaj. They started considering Shivaji Maharaj as the father and inventor of this nation.

Maharaj was not only a brave warrior but also a great fighter. At the same time, he was a good ruler. Maharaj personally pays attention in state affairs. The area around Swarajya was under the control of Mughals as well as Adilshah and Maharaj was always in a position to attack the enemy in his early days to bring that area under his Swarajya. But the Maharaja never imposed excessive or unnecessary taxes on the people to pay for the invasion. Whenever they needed money to conquer a kingdom and did not have enough money to spend, they avoided attacking that king. But he never let his people suffer. He always felt that our people should not be burdened financially. Shivaji Maharaj is an extraordinary and unique person in history. Therefore, he was not quickly recognized by his enemies, but also by his friends. Aurangzeb knew Maharaj the most. Because he had warned Adilshah about Shivaji Maharaj when he was first time appointed as Subhedar in Mughal military. During his second appointment as Subhedar in Mughal military, the Maharaj showed their clear intentions to Aurangzeb by winning Junnar and Bhiwandi.

The victory over Afzal Khan was an important victory in Maharaj’s life. Because of this victory, the Maharaj got an estimated 65 elephants, 4000 Arabian horses, 1200 camels and 3 lakh rupees worth of jewels and 2000 high quality cloths (worth about 7 lakh rupees). Apart from this they got many cannons, guns, and other weapons from this conquest. Also, more than ten thousand people joined Swarajya and all this was in the interest of Swarajya.’

– Famous Historian Narhar Kurundkar

Proud! Share it!

Amazon Ads - Realme Narzo 70 pro 5g
bold ear birds

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *